Pune Murder Case : वाघोलीतील बायफ रोडवरील आर.पी.एस हेरिटेज सोसायटी मधील एका फ्लॅटमध्ये एका तरुणाचा मित्रांनीच गळा चिरून खून केल्याची घटना शनिवारी (दि.२४) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. खून झालेला तरुण व त्याचे मित्र सर्वजण चंदननगर परिसरातील असून ते वाघोली येथील मित्राच्या फ्लॅट आले होते. हल्लेखोरांमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. विकी विजय दिवटे (वय २१ वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नंदा दिवटे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवटे व इतर पाच तरुण शनिवारी रात्री वाघोलीतील आरपीएस हेरिटेज सोसायटीतील प्रतिक मोरे याच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आले. तेथे दिवटे व अन्य जणांमध्ये वाद झाले. यामध्ये दिवटे याच्या गळ्यावर चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केला. अतिशय क्रूरतेने त्याचा गळा चिरला होता. त्यानंतर ते पळत सोसायटीच्या गेट बाहेर गेले. या सोसायटीच्या समोरील इमारतीतच गुन्हे शाखा युनिट सहाचे कार्यालय आहे. ते पळून गेल्यानंतर सोसायटी मधील नागरिकांना खून झाल्याचे कळले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित तपासासाठी टीम दाखल केल्या. त्यांना पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतले असून वाघोली येथे आणण्यात येत आहे. नेमके कारण तपासातून पुढे येणार आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत. हेही वाचा : Pune Crime News : भर रस्त्यात पतीकडून १९ वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या; पोलिसांकडून पतीला बेड्या Pune Crime News : पैशांचा व्यवहार जीवावर बेतला; सिंहगड रोडच्या तरुणाची मित्रांनीच केली हत्या