दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; आव्हाळवाडी रोडवरील घटना
Updated On:

वाघोली – भाजी खरेदी करण्यासाठी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना वाघोली येथील आव्हाळवाडी रोडवर ग्रँड व्हेनटीला सोसायटीच्या गेटजवळ बुधवारी (दि. २) रात्री पावणे आठच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वाघोली येथील ३७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.





