Wagholi News : वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर करा; संपत गाडे यांचे निवेदन; पोलीस आयुक्तांकडे मागणी
Wagholi News : पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाघोलीतील ग्रामस्थ आणि वाहतूक नियंत्रण समिती आक्रमक झाली आहे.

Wagholi News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक नोंदीसाठी केलेल्या प्रयत्नांना बद्दल कौतुक करत वाघोली मधील ग्रामस्थांनी वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण समितीचे प्रमुख संपत गाडे यांनी दिली. (Wagholi News)
पोलीस आयुक्तांना वाघोली मधील वाहतूक कोटी दूर करण्यासाठी वाहतूक नियंत्रण समितीच्या संयोजकांनी वाघेश्वर, आव्हाळवाडी व केसंनद चौकात रहदारीच्या वेळेस अधिक पोलिस बंदोबस्त ठेवावा. उलट मार्गाने येणाऱ्या वाहनावर तातडीने दंडात्मक कारवाई करावी. (Wagholi News)
रहदारी प्रतिबंधक पथक स्थापन करावे व त्यात स्थानिक नागरिकांचाही समावेश करावा. वाघेश्वर मंदिर ते बीजेएस कॉलेज दरम्यान रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यास मनाई करावी, व अशा वाहनांवरही दंडात्मक कारवाई करावी. (Wagholi News)
शाळेच्या वेळेत रस्त्यावर येणाऱ्या स्कूल बस यांच्याबाबत शाळा प्रशासनाशी चर्चा करून त्यासंदर्भात अधिक नियोजन करता येणे शक्य होईल.वाघोली परिसरातील ज्या शाळांच्या अधिक बस आहेत त्यांच्या शक्य असल्यास शाळेच्या वेळेत बदल केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. (Wagholi News)
केसनंद फाटा चौकातील वाहतुकीचा स्वतंत्र्य अभ्यास करून सिग्नल व युटर्न याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी. जड वाहनांसाठी गर्दीच्या वेळेत असलेल्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. (Wagholi News)
अंतर्गत रस्ते दुरूस्ती व रूंदीकरण करणे आवश्यक आहे. अंतर्गत रस्त्यावर व पुणे नगर रस्त्यावर पुन्हा निर्माण झालेली अतिक्रमणे तातडीने हटविणे महत्त्वाचे आहे. अपघात स्थळी तातडीने पोलिस पाठवून रस्ता प्रथम मोकळा करून पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. (Wagholi News)
या मागण्या केल्या असून पोलीस आयुक्तांनी याबाबत सकारात्मक पवित्रा घेत वाघोलीतील वाहतूक कोंडी तातडीने दूर करण्यासाठी योग्य ते उपाय योजना करण्यात येईल अशा आश्वासन वाहतूक नियंत्रण समितीला दिले आहे. (Wagholi News)
वाघोली आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी संपत गाडे यांनी वाहतूक नियंत्रण करणारे भोंगे लावून वाहतूक नियंत्रण केले आहे. वाघोली, केसनंद, कोरेगाव भीमा, आदी परिसरात नागरिक या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. उपाय योजनांचा अभ्यास करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखील पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
– निलेश गिरमे, युवा सेना शहर प्रमुख, पुणे





