वाघोली : कारगिलच्या उंच शिखरावर भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे स्मरण म्हणून २६ जुलैला कारगिल विजय दिन साजरा केला जातो. माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने वाघोली येथे शहीद वीर जवानांना अभिवादन करीत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस व देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस असल्यामुळे बाईफ रोड येथील माजी सैनिक संघटना वाचनालय येथे लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत वीर जवानांना आदरांजली देण्यात आली.
‘कारगिल विजय दिवस ‘ माजी सैनिक कल्याण संघटना पुणे यांच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक व परिवार मोठया संख्येने उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन अभिजित जगताप, आमदार अशोक पवार ,सरपंच वसुंधरा उबाळे सरपंच, माजी सरपंच माणिकराव सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे, शिवसेना नेते दौलत पायगुडे, पोलीस निरीक्षक लोणीकंद गजानन पवार, कांताराम सातव, जान पठाण, संग्राम जाधवराव,अनिल जाधवराव, बाळासाहेब सातव,माणिकराव शामराव सातव,भा ज पा नेते दादासाहेब सातव, विशाल सातव पाटील ,मारुती कुटे, आनंद गोसावी, कल्याण लगड, बाळासाहेब वायकर,माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव साहेब ,कॅप्टन परशुराम शिंदे, इतर सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते.