Wagholi : दीड वर्ष पोलिसांना चकवा; वाडेबोल्हाईत मित्राच्या घरी लपलेला मोक्का आरोपी अखेर जेरबंद
Wagholi : गजानन मारणे टोळीतील श्रीकांत पवार याला गुन्हे शाखेने वाडेबोल्हाईतून अटक केली. तो दीड वर्षापासून फरार होता.
Updated On:

Wagholi : गजानन मारणे टोळीचा सदस्य श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (३९, रा. वडगाव रासाई, शिरूर) याला गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने वाडेबोल्हाई येथून अटक केली. कोथरूड पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई झाली होती. तो गेल्या दीड वर्षापासून फरार होता.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून पवार हा वाडेबोल्हाईतील अपनाघर सोसायटीत मित्रासोबत राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून घराला चारही बाजूंनी घेरले. पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेण्यात आले.





