Voting till 11 pm । राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदानाची सकाळीच सुरुवात झाली. या टप्प्यात राज्यतील 11 लोकसभा मतदारसंघांमधील दिग्गज उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.त्यामध्ये पुन्हा एकदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले आहे. राज्यातील पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण 17.51 टक्के मतदान झाले. त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान म्हणजे २२.१२ टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर जालन्यात २१.३५ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी Voting till 11 pm । जळगाव – 16.89 टक्के जालना – 21.35 टक्के नंदुरबार – 22.12 टक्के शिरूर – 14.51 टक्के अहमदनगर – 14.74 टक्के छ. संभाजीनगर – 19.53 टक्के बीड – 16.62 टक्के मावळ – 14.87 टक्के पुणे – 16.16 टक्के रावेर – 19.03 टक्के शिर्डी – 18.91 टक्के