तामिळनाडूतील सर्व 39 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण; 69.46 टक्के झाले मतदान
Updated On:

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी तामिळनाडूच्या सर्व ३९ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली असून या राज्यात एकूण ६९.४६ टक्के मतदान झाले.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार धर्मपुरी मतदारसंघात सर्वाधिक ८१.४८ टक्के मतदान झाले.
तिरुवल्लूर, चेन्नई उत्तर, श्रीपेरुम्बुदूर, कांचीपुरम येथे ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर अरक्कोनम, वेल्लोर कृष्णागिरी , तिरुवन्नमलाई, अरणी, विलुप्पुरम, कल्लाकुरीची, सालेम, नमक्कल या मतदार संघांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या राज्यात द्रमुक आघाडीने ३९ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी इंडिया आघाडीला येथे सर्व ३९ जागा जिंकण्याचा विश्वास आहे. भाजपचे अस्तित्व या राज्यात नगण्य आहे. लक्षद्वीपमध्येही ८३.८८ टक्के मतदान झाले.





