मतदान हा आपला केवळ हक्क नसून कर्तव्य आहे
Updated On:

पिंपरी: मतदान हा आपला केवळ हक्क नसून कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी असलेल्या सुट्टीनिमित्त बाहेर फिरायला न जाता सोमवारी (दि. २१) मतदान करा. प्रत्येक राजकीय पक्षांना किंवा उमेदवाराला आपण वाईट ठरवून मोकळे होतो. कोणीतरी कमी वाईट असेल त्याला मतदान करा. व्यक्त व्हा, मतदान करा. कोणताच उमेदवार पसंत नसेल तर नकाराधिकार म्हणजे ‘नोटा’ला मतदान करा, असे आवाहन प्रसिद्ध नाट्य अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांनी रविवारी दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातशी बोलताना केले.
टॅग्स:





