शिवणे येथील श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळाकडून मतदान जनजागृती

Updated On:

शिवणे : दरवर्षी मोठ्या दणक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर गेल्या वर्षापासून कोरोनाच्या विघ्नाचे सावट पसरले आहे. त्यामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. असे असतानाही गणेश मंडळांचा उत्साह पूर्वीप्रमाणेच आहे. यंदा गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक नसले तरी अनेक गणेश मंडळांनी आपली विविध उपक्रमांची परंपरा जपली आहे. अनेक गणेश मंडळाकडून अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या शिवणे येथील अष्टविनायक मित्र मंडळाने यंदा नागरिकांना मतदाना विषयी जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.

यावर्षी ३२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अष्टविनायक मित्र मंडळाने ‘मतदान जनजागृती अभियान’ राबविले असून यामाध्यमातून ”जागृत नागरिक होऊया, अभिमानाने मतदान करु या, मतदान करा… देश घडवा” असे संदेश गणेशभक्तांना देण्यात आले आहेत. यासाठी मतदान करण्याचे संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्या आहेत.भारतीय लोकांचा राजकारण हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र असे असूनही अजूनही अनेक लोकांची मतदानाविषयी अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मंडळाने रांगोळीच्या माध्यमातून मतदानाविषयी जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.

श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्य केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादीत नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून शिवराज्यभिषेक दिन सोहळ्या निमीत्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मागील वर्षी 177 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यंदा 243 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यासह अन्य् सामजिक उपक्रम श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळाकडून राबविण्यात येत असतात. कोकणात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत सुद्धा मंडळाने आपले योगदान दिले आहे.

शिवणे येथिल श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ यावर्षी ३२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ३१ वर्षाचा समाजसेवेचा अनुभव मंडळाकडे असून दरवर्षी मंडळाकडून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. यावर्षी निवडणूक आयोगाच्या वतीने सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांना मतदानाबाबत जनजागृती अभियानाचे पत्रक देण्यात आले असून आमच्या मंडळाने आयोगाच्या विनंतीस मान देवून मतदान जनजागृती अभियान राबविले आहे.
सचिन देशमुख
अध्यक्ष, श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ

गेल्या दोन ते तीन वर्षात महाराष्ट्रात सुरुवातीला कोल्हापूरात पुराचे संकट आले. त्यानंतर दोन वर्षे झाले करोना आला या संकटकाळी श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मार्फत शिवणे व उत्तमनगर भागात 20 हजार पेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून तिसऱ्या लाट थोपविण्यासाठी मंडळाचे कार्य चालू आहे.
अतुल दांगट
उत्सवप्रमुख, श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्या निमीत्ताने दरवर्षी मंडळाकडून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. यावर्षी 243 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. याचबरोबर दरवर्षी श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम घेत असते.
सचिन दांगट
कार्याध्यक्ष, श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ

आणखी संबंधित बातम्या

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

2026-09-09 22:39:52

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

Satara: कृत्रिम विसर्जन तळ्याची पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून आढावा

2026-09-09 08:08:17

Satara: कृत्रिम विसर्जन तळ्याची पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून आढावा

Shadu clay : शाडू मातीच्या मूर्तींना मोठी मागणी; मात्र बाजारात संख्या कमी

2026-09-09 07:49:22

Shadu clay : शाडू मातीच्या मूर्तींना मोठी मागणी; मात्र बाजारात संख्या कमी

Pune : झाडणकामासाठी दुप्पट कर्मचारी तरी कचरा पडूनच

2026-09-08 20:05:24

Pune : झाडणकामासाठी दुप्पट कर्मचारी तरी कचरा पडूनच

Sambhaji Bhide : दहीहंडीत महिलांना नाचवणाऱ्यांवर संभाजी भिडे संतापले; डीजे-डॉल्बीवरही आक्षेप

2026-09-08 16:15:46

Sambhaji Bhide : दहीहंडीत महिलांना नाचवणाऱ्यांवर संभाजी भिडे संतापले; डीजे-डॉल्बीवरही आक्षेप