Voter: मतदार संख्या ९० लाखांवरून ६२ लाखांवर
Voter:

जिल्ह्यातील २८ लाख ६९ हजार ७९५ मतदारांकडून पडताळणीच नाही
– दि. २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी
– प्रारूप मतदार यादीनंतर नव्याने अर्ज करण्याची संधी
Voter: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मतदारांनी गणना अर्ज भरू देण्याची मुदत संपल्यानंतर आता जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या किती असेल, याची संभाव्य आकडेवारी निश्चित झाली आहे. त्यानुसार यापूर्वी जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ इतके मतदार होते.
नव्या पडताळणीनुसार आता जिल्ह्यात एकूण ६२ लाख १० हजार ३७४ इतकी मतदारांची संख्या राहील, असा अंदाज आहे. या संभाव्य आकडेवारीनुसार जिल्ह्यात भोसरी विधानसभा मतदारसंघ हा सर्वांत मोठा मतदारसंघ असणार आहे, तर सर्वांत लहान शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि. १७) मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची मुदत संपली असून, त्यात जिल्ह्यातील ६२ लाख १० हजार ३७४ मतदारांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे, तर २८ लाख ६९ हजार ७९५ मतदार एकतर अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत किंवा दुबार आहेत.
ग्रामीण मतदारसंघ
मतदारसंघाचे नाव – पूर्वीची मतदारसंख्या – संभाव्य मतदारसंख्या
जुन्नर – ३,२९,७५४ – २,८२,७७३
आंबेगाव – ३,१७,९४७ – २,७६,४६५
खेड – ३,७८,७१३ – ३,२२,६६०
शिरूर – ४,८१,९९० – ३,७२,००७
दौंड – ३,२३,०९९ – २,६९,११९
इंदापूर – ३,४७,१४१ – २,९४,९२५
बारामती – ३,८०,९२३ – ३,३६,०५७
पुरंदर – ४,९७,७७० – ३,०९,४९५
भोर- मुळशी- राजगड – ४,५०,२०६ – ३,५९,२८०
मावळ – ३,८२,७८८ – २,९०,७२३
पुणे शहरातील मतदारसंघ
मतदारसंघाचे नाव – पूर्वीची मतदारसंख्या – संभाव्य मतदारसंख्या
वडगाव शेरी – ५,१८,७५४ – ३,१४,६५२
शिवाजीनगर – २,९२,८५१ – १,६२,६१८
कोथरूड – ४,४८,०५५ – २,४०,७७६
खडकवासला – ५,९७,११४ – ३,१८,६६२
पर्वती – ३,७१,२३४ – २,१९,२१४
हडपसर – ६,५१,४७३ – ३,५२,९२७
पुणे कॅन्टोन्मेंट – ३,०१,१५२ – १,७९,३०६
कसबा पेठ – २,८४,६७२ – १,९२,०८७
पिंपरी- चिंचवड शहरातील मतदारसंघ
मतदारसंघाचे नाव – पूर्वीची मतदारसंख्या – संभाव्य मतदारसंख्या
चिंचवड – ६,८७,४४८ – ४,१७,३५१
पिंपरी – ४,०१,९७५ – २,३६,१४८
भोसरी – ६,३५,११४ – ४,६३,१२९





