पिंपरी | चांदखेड येथील विद्यालयात मतदार जागृती फेरी
Updated On:

चांदखेड, (वार्ताहर) – येथील ग्रामसचिवलयाच्या वतीने मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड व पी. एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदखेड या शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, समूह नृत्य सादर करून सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे, असे आवाहन केले. या विद्यार्थ्यांना उपशिक्षिका सरला भोये यांनी मार्गदर्शन केले. सोनूली घोटकुले व पूजा दराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सरपंच मीना माळी, मुख्याध्यापक अजिनाथ ओगले, तलाठी योगेश वाघ, ज्येष्ठ शिक्षक सत्यवान पवार, मुख्याध्यापिका ए. एस. शिंदे, ग्रामस्थ, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.





