तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधींची सूर्य मंदिरात भेट ; मुकेश साहनी यांनीदेखील यांच्यात चर्चा

Voter Adhikar Yatra। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने कालपासून सासाराम येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मतदार हक्क यात्रा सुरू केली. त्यातच काँग्रेसने निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. या दरम्यान राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते तेजस्वी यादव हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सूर्य मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. तेजस्वी यादव यांनी याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ,”त्यांनी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव याठिकाणी असलेल्या सूर्यदेवाला समर्पित सूर्यमंदिराला भेट देऊन बिहारच्या प्रगती, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली” असे म्हटले आहे.
तेजस्वी यादव यांनी या प्राचीन सूर्यमंदिराची खासियत सांगितली Voter Adhikar Yatra।
पुढे तेजस्वी यादव यांनी,”या प्राचीन सूर्यमंदिराची खासियत अशी आहे की हे मंदिर इतर सूर्यमंदिरांसारखे पूर्वेकडे तोंड करून नाही तर पश्चिमेकडे तोंड करून आहे.” असे म्हटले. यादरम्यान राहुल गांधी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. मंदिर प्रशासनाने दोन्ही नेत्यांचा सन्मान केला आणि मंदिराचा फोटो सादर केला. यावेळी शेकडो राजद आणि काँग्रेस कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे स्वागत केले Voter Adhikar Yatra।
यादरम्यान, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) चे प्रमुख मुकेश साहनी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. सूर्य मंदिरात पोहोचल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. मंदिराची प्रदक्षिणा केल्यानंतर त्यांचा ताफा रफीगंजला रवाना झाला.





