VIने ‘रिचार्ज’चे दर वाढवले; आता कमीत कमी ‘एवढ्या’ रुपयांचं करावं लागणार रिचार्ज
Updated On:

नवी दिल्ली – एअरटेलनंतर व्होडाफोन आयडिया मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीने आपल्या कॉल आणि डेटा दरात 20 ते 25 टक्क्यापर्यंत वाढ केली. ही दरवाढ 25 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
आता या कंपनीचा किमान दर 99 रुपये इतका झाला आहे. ईतर व्हाईस आणि डेटा दरातही कंपनीने 20 ते 25टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. मोबाईल कंपन्यांनी दरडोई महसूल वाढविण्याचे ठरविले असल्याचे दिसून येत आहे. एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीने दरवाढ जाहीर केली असले तरी रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी दरवाढ जाहीर केलेली नाही.





