मोबाईल कंपन्यांत जिओ आघाडीवर
Updated On:

नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यात एकूण फोन वापरणार्यांची संख्या वाढून 118.99 कोटी इतकी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात ही संख्या 118.71 कोटी इतकी होती. यामध्ये लँडलाईन आणि मोबाईल फोन धारकांचा समावेश आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीचे 47.65 कोटी ग्राहक आहेत. भारती एअरटेल कंपनीचे 28.93 कोटी ग्राहक आहेत. तर वोडाफोन आयडिया कंपनीचे 12.63 कोटी ग्राहक आहेत.
डिसेंबर महिन्यात शहरातील टेलिफोन धारकांची संख्या वाढून 65.98 कोटीवर गेली आहे. तर ग्रामीण भागातील टेलिफोन धारकांची संख्या 52.72 कोटी इतकी आहे. एकूण टेलिफोन धारकामध्ये खासगी कंपन्यांचा वाटा 91.92 टक्के इतका आहे. तर बीएसएनएल आणि एमटीएनएल चा वाटा केवळ 8.08% इतका आहे.





