विवेक अग्निहोत्री ‘सालार’ चित्रपटावर भडकले, म्हणाले “प्रेक्षकांना मूर्ख बनवणे…”

मुंबई – अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरूष’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. अनेकांना या चित्रपटाची कथा रुचली नाही. यामुळे या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर आता प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. मात्र हा टीजर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना पसंत पडला नाही. यामुळे त्यांनी ट्वीटद्वारे संताप व्यक्त केला आहे.
एका यूजरच्या ट्विटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ‘लोक जन्मजात हिंसक नसतात. तुमच्या मुलांच्या डोक्यात इंडस्ट्रीच्या नेत्यांकडून लोकप्रिय साहित्य, सिनेमा आणि राजनीतीला, हिंसेला ग्लॅमरस करुन तयार केलं जाते. ज्यांना वास्तविकरित्या तरुणांच्या मनाला शांती मिळविण्यासाठी प्रेरित करायला हवे. अशा हिंसक जगात क्रिएटिव्ह कॉन्शियस हा एकमेव उपाय आहे.’
दुसर्या ट्विटमध्ये अग्नीहोत्री यांनी लिहिले की, ‘आम्ही उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि दमदार कथाचा वापर करुन असे भव्य चित्रपट बनवले आहेत. उदाहरणार्थ, शोले. पण आता प्रेक्षकांना मूर्ख बनवणे, मार्केटिंग हाईप आणि मोठ्या आवाजात लाऊड अॅक्शन करून चित्रपट हिट होऊ शकतो, असा विश्वास सगळ्यांनाच वाटत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर पाहता हे खरे वाटते.’ विवेक यांनी ट्विटमध्ये चित्रपटाचे नाव घेता ‘सालार’वर टीका केली आहे.
यावेळी त्यांनी हॉलिवूडच्या स्टार टॉम क्रूझच्या आगामी ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग’ या चित्रपटाचेही कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘Experiment. Innovation. Engineering. Execution. असाधारण अॅक्शन सिनेमाची दुनिया ‘मिशन फिल्म’. एखाद्या दिवशी फक्त स्टार इमेज तयार करण्याऐवजी आपण असं काहीतरी तयार करू, अशी मला आशा आहे.’
We have also made such grand films with great engineering and powerful stories. Sholay, for example.
But now everyone believes dumbing down the audience, creating marketing hype and nonsense action with loud sound can make a film hit. Looking at Indian BO, it’s true also. https://t.co/PY6k5vo68v— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 6, 2023
दरम्यान, ‘सालार पार्ट 1 – सीझफायर’ यात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिन्नू आनंद, जगपती बाबू आणि ईश्वरी राव असे अनेक स्टार्स आहेत. हा तेलगू चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. KGF आणि KGF 2 चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनीच सालारचे दिग्दर्शन केले आहे.





