अभिनेत्री अमृता रावने पतीसोबत डिलिव्हरीचा व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सोशल मीडियावरील Vlogद्वारे अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. आता अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाच्या प्रवासानंतर तिच्या मुलाच्या जन्माशी संबंधित Vlog चाहत्यांशी शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने डिलिव्हरी रूमचा फोटोही इंस्टाग्रामवर टाकला आहे.
https://www.instagram.com/p/Cd-JFiSvy8E/?igshid=YmMyMTA2M2Y=
या छायाचित्रात अमृता राव आणि अनमोल हॉस्पिटलच्या खोलीत दिसत आहेत आणि मुलाच्या जन्माच्या वेळी अनमोल अमृताचे लाड करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ऑपरेशन थिएटरमध्ये वीरचा जन्म झालेला क्षण…जेव्हा शब्द नसतात… हे तेच चित्र.. यासोबतच अमृताने इमोजीही टाकले आहेत.
अमृताच्या Vlog बद्दल सांगायचे तर, यामध्ये तिने चाहत्यांसोबत मुलाची डिलिव्हरीची सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती शेअर केली आहे. अमृताने तिचे आरजे अनमोलसोबतचे लग्न अगदी गुपित ठेवले होते, गरोदरपणाला सुद्धा अभिनेत्रीने जास्त ग्लॅमर दिले नाही. मात्र, आता अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक Vlogच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
अमृता राव इंडस्ट्रीत साध्या आणि सरळ भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जाते. प्रेक्षकांनाही तिला अशाच पात्रांमध्ये पाहायला आवडते. मात्र, यावेळी अमृता चित्रपटांपासून दूर राहून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे तसेच युट्युब चॅनल कपल ऑफ थिंग्ज चालवत आहे.





