श्री क्षेत्र तुळापुर येथे जिल्हाधिकार्यांची भेट

वाघोली – श्री क्षेत्र तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या विकास आराखड्यासंदर्भात गाव भेटीसाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, शिरूर – हवेलीचे आमदार अशोक बापू पवार उपस्थित होते.धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा समाधीस्थळ विकास आराखडा राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री मा. नामदार अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक, जागतिक दर्जाचा, भव्यदिव्य व आधुनिक असा आराखडा जिल्हाधिकारी यांनी स्वतः व त्यांचे सर्व प्रशासनातील अधिकारी यांना सोबत घेऊन तुळापूर गावातील आवश्यक ठिकाणाच्या भेटी घेऊन पाहणी केली.
यावेळी हवेली उपविभागीय अधिकारी संजयजी आसवले , शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख , कार्यकारी अभियंता अनिल ढेपे साहेब, हवेली तहसीलदार तृप्ती कोलते पाटील , शिरूरच्या तहसीलदार सौ रंजना उंबरहांडे ,शिरूरचे गटविकास अधिकारी नलावडे साहेब,वाघोली मंडळ अधिकारी अशोक शिंदे ,
उप अभियंता मयूर सोनवणे , भुमिअभिलेख तालुका निरीक्षक ठाकरे साहेब, पुरातत्त्व विभागाचे वाहणे ,लोणीकंद चे पोलीस निरीक्षक गजानन पावर , ग्रामसेवक महाले दादा,तलाठी डुंबरे ,तलाठी पवन शिवले,प्रदीप कंद, ग्रामपंचायतच्या सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले ,माजी सरपंच माऊली दादा शिवले, माजी सरपंच गणेश पुजारी, माजी सरपंच रुपेश शिवले,माजी सरपंच लोचन शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले,माजी उपसरपंच पवन शेठ खैरे, चेरमन रमेश शिवले, माजी चेरमन राजू नाना शिवले, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शिवले, सुनीता शिवले,श्री विनोद राऊत,नवनाथ शिवले,आप्पासाहेब जगताप,पांडुरंग शिवले,दत्तात्रेय शिवले,ज्ञानेश्वर शिवले, हनुमंत शिवले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





