होळीचा रंग लावण्यासाठी आलेल्या वृद्धाला भाजप नेत्याने दिला पायांनी आशीर्वाद ; घटनेचा व्हिडीओ व्हायरल, पक्षाने बजावली नोटीस

Vishnu Sharma kicks old man । मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील तेंदुखेडा त्याठिकाणचे नगर पंचायत अध्यक्ष विष्णू शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते एका वृद्धाला पायाने आशीर्वाद देत आहेत. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला असून पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आलीआहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि होळीच्या वेळी लोक एकमेकांना गुलाल लावत होते, त्याच वेळी तेंदुखेडा नगरपंचायत अध्यक्ष विष्णू शर्मा यांनी गुलाल लावणाऱ्या रज्जन अग्रवाल यांना लाथ मारली आणि ते उठून निघून गेले.
विष्णू शर्मा यांनी मीडिया कॅमेऱ्यांसमोर येण्यास नकार दिला, परंतु फोनवर दावा केला की रज्जन त्यांचा बालपणीचा मित्र आहे. तसेच त्यांनी नगर पंचायतीतील महिला आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होता, म्हणून त्याला थांबवण्यासाठी हे करावे लागले.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, लोकप्रतिनिधीने असे कृत्य करणे योग्य आहे का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
पक्षाने घेतली दखल Vishnu Sharma kicks old man ।
भाजप जिल्हाध्यक्षा रामस्नेही पाठक म्हणाले , “आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पक्षाची शिस्त लक्षात घेऊन, विष्णू शर्मा यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि उत्तर मागवण्यात आले आहे. जर व्हिडिओ खरा असल्याचे आढळले तर योग्य ती कारवाई केली जाईल.”अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
याआधीही शर्मा यांनी बाजारात रज्जन अग्रवालला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की रज्जन मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, परंतु जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीचे असे वर्तन संशयास्पद आहे.
सोशल मीडियावर चर्चा तीव्र Vishnu Sharma kicks old man ।
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक शर्मा यांच्या वर्तनाचा निषेध करत आहेत आणि लोकप्रतिनिधीने असे वागणे योग्य नाही असे म्हटले आहे. तर काही वापरकर्त्यांनी याला ‘किक ब्लेसिंग’ असे म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा
अमेरिकेत २९५ भारतीय तुरुंगात ; आता सरकार काय करणार?, परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत दिले उत्तर





