विष्णू घोडेचोर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती! तेलकुडगाव ग्रामस्थांनी केला सत्कार

नेवासा (प्रतिनिधी) – शेवगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत असलेले तसेच कोपर्डी ,जवखेडा व जामखेड दुहेरी हत्याकांड घटनेच्या तपास पथकाचे सदस्य सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू घोडेचोर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आल्याने तेलकुडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
घोडेचोर हे नेवासा तालुक्यातील देवसडे येथील भूमिपुत्र असून ते १९९१ मध्ये पोलीस दलामध्ये भरती झाले होते. ते सध्या उपविभागीय पोलीस उपाधीक्षक कार्यालय शेवगाव या ठिकाणी सेवेत आहेत त्यांनी सेवा कार्यकाळात राहुरी,शेवगाव, पाथर्डी ,लोणी पोलीस ठाण्यात तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगर या ठिकाणी सात वर्ष सेवा केली. त्या दरम्यान अतिशय संवेदनशील अशा कोपर्डी , जवखेडा येथील हत्याकांड तसेच जामखेड दुहेरी हत्याकांडाच्या तपास पथकाचे सदस्य होते.
गेल्या एक वर्षांपासून ते शेवगाव येथे बदलून आले आहेत. त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी भरती मिळाल्याने तेलकुडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सतीश काळे, उपसंरपच शरद काळे, माजी सरपंच बालकनाथ काळे, काकासाहेब काळे, भारत काळे, नामदेव घोडेचोर,उत्तम सरोदे, जयवंत घोडेचोर, बापु साळवे, सुरेश काळे, साहेबराव काळे, दत्तात्रय गटकळ तसेच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब काळे यांनी स्वागत केले.





