कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीने घेतला गळफास; तळोजा कारागृहात संपवलं जीवन

Vishal Gawali | कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहात पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर तिचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला आणि विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते.
विशालच्या पत्नीने केली मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत
विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली असून त्यातील दोघीजणी त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. धक्कादायक म्हणजे विशाल गवळीच्या पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची माहिती तपासात समोर आली होती. या दोघांनी एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात फेकून दिला होता. Vishal Gawali |
कल्याणमधील सराईत गुंड
विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. विशाल गवळीने तो राहात असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान, विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. Vishal Gawali |
हेही वाचा:
न्यूझीलंडवरुन थेट पुण्यातील सिंहगडावर आलेला विदेशी पाहुणा आहे तरी कोण? वाचा त्याच्याबद्दल…




