पणजी :– महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकून जलतरणामध्ये दुहेरी धमाका साजरा केला. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रजत व एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदकांची कमाई केली.
ऑलिम्पिकपटू वीरधवलने 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.60 सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली आणि 2015 मध्ये त्यानेच नोंदवलेला 24.73 सेकंद हा विक्रम मोडला. त्याने 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकून वेगवान जलतरणपटूचा मान मिळाला होता. याच शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा मिहीर आंम्ब्रेने वीरधवलच्या पाठोपाठ 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.67 सेकंदांत पार करीत रजतपदक जिंकले.
Virdhawal Khade conquers the pool to secure the Gold Medal in the 50m Butterfly event for Maharashtra at the National Games. His aquatic excellence is a testament to hard work and determination!@Nat_Games_Goa @BansodeSpeaks#TeamMaharashtra #JayMaharashtra#goforgold #getsetgoa pic.twitter.com/8tRQUGqsUk
— Maharashtra Olympic Association (@MahaOlympic) November 2, 2023
पुरुषांच्या 100 मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दासने 57.37 सेकंद वेळ नोंदवत रजतपदक जिंकले. या शर्यतीत ऑलिम्पिकपटू श्रीहरी नटराजन (55.59 सेकंद) हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
पलक जोशीची सोनेरी कामगिरी…
महिलांच्या 100 मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशीने सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर एक मिनिट, 05.29 सेकंदात पार केले. याआधी तिने या स्पर्धेत 200 मीटर्स बॅकस्टोक शर्यतीचेही विजेतेपद मिळवले होते.
Diving into the win! 🥇🏊♀️
Palak Joshi makes Maharashtra proud with her Gold Medal victory in the 100m Backstroke at the National Games. Her aquatic prowess and dedication shine bright in the pool. A truly remarkable achievement! 💫@Nat_Games_Goa @BansodeSpeaks#TeamMaharashtra pic.twitter.com/pslFpLbyMQ— Maharashtra Olympic Association (@MahaOlympic) November 2, 2023
50 मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत मात्र ऋजुता खाडेला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर 28.38 सेकंदांत पार केले. याआधी तिने या स्पर्धेत 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली होती.