IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटच्या नावावर होणार ‘हा’ विक्रम

19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफ़ीला सुरुवात झाली आहे. आज भारत विरद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्याचा टॉस पाकिस्तानने जिकला. या सामन्यात विराट कोहलीला एक विराट विक्रम करण्याची संधी आहे.
विराट रचणार ‘हा’ विक्रम
विराट कोहलीला 14,000 वनडे धावांचा टप्पा पार करण्यासाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फक्त 15 धावा करण्याची गरज आहे. जर विराटने आज 15 धावा केल्या तर 14,000 वनडे धावांचा हा टप्पा गाठणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. तसेच 300 पेक्षा कमी डावात ही कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनाच 14,000 वनडे धावा करता आल्या आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत 286 एकदिवसीय डावांमध्ये 13,985 धावा केल्या आहेत, ज्यात 50 शतके आणि 73 अर्धशतक यांचा समावेश आहे. त्याची सरासरी 57.78 आहे. 2023 च्या विश्वचषकात कोहलीने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रमही मागे टाकला होता.
विराटची चॅम्पियन्स ट्रॉफ़ीमधील कामगिरी
विराट कोहलीची या स्पर्धेची सुरुवात काही खास झाली नाही. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ 22 धावा केल्या, ज्यात 38 चेंडूत केवळ एक चौकार त्याने लगावला. त्याचा स्ट्राईक रेट फक्त 57.89 होता. मात्र, विराटची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी नेहमीच चांगली आहे.





