मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला, तरी त्याने आयसीसीच्या रँकिंगमध्ये इतिहास रचला आहे. 2024 टी-20 वर्ल्डकप जिंकल्यावर विराटने रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच, इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम केला. आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहे. मात्र, दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही विराटने आयसीसी रँकिंगमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 16 जुलै 2025 रोजी जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये विराटने 909 रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत. यापूर्वी त्याचे रेटिंग 897 होते, पण नव्या रँकिंगमध्ये त्याने 900 चा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, विराट हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-20) 900 पेक्षा जास्त रेटिंग मिळवणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला असा पराक्रम करता आला आलेला नाही. In Test – 937 Points In ODI – 911 Points In T20I – 909 Points VIRAT KOHLI BECOMES THE FIRST PLAYER TO HAVE 900+ RATING IN ALL FORMATS – THE GOAT 🐐 pic.twitter.com/ZvPo0epsFS — Johns. (@CricCrazyJohns) July 16, 2025 विराटचे रेटिंग पॉईंट्स वनडे : 937 रेटिंग पॉइंट्स कसोटी : 911 रेटिंग पॉइंट्स टी-20 : 909 रेटिंग पॉइंट्स विराट हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 900+ रेटिंग मिळवणारा भारताचा दुसरा आणि जगातील पाचवा फलंदाज आहे. याआधी भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने हा टप्पा गाठला होता. टी-20 मध्ये 900+ रेटिंग मिळवणारे फलंदाज 1. डेव्हिड मलान (इंग्लंड) – 919 2. सूर्यकुमार यादव (भारत) – 912 3. विराट कोहली (भारत) – 909 4. आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) – 904 5. बाबर आझम (पाकिस्तान) – 900 विराटच्या या ऐतिहासिक कामगिरीने त्याचा क्रिकेटविश्वातील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. निवृत्तीनंतरही त्याची लोकप्रियता आणि प्रभाव कायम आहे.