Paris Olympics 2024 : विराट कोहलीचा ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंना खास Video संदेश…! जाणून घ्या, काय म्हणाला…

Virat Kohli’s special message for Indian athletes : पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. या खेळांमध्ये 196 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. भारतातील 120 हून अधिक खेळाडू भाग घेणार आहेत. क्रीडा महाकुंभासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत आहे. उत्साही लोकांमध्ये विराट कोहलीचे नावही जोडले गेले आहे. विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना खास संदेश दिला आहे. किंग कोहलीने आणखी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके आणण्याबाबत सांगितले.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोहलीने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देताना प्रत्येक भारतीयानं खेळाडूंना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
कोहलीने दिले प्रोत्साहन…
सोशल मीडियावर शेअर केलेल्या जवळपास एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कोहली म्हटले आहे की, “इंडिया, भारत, हिंदुस्थान… एक काळ असा होता की जगभर भारताकडे फक्त साप आणि हत्तींची भूमी म्हणून पाहिले जायचे. पण काळानुसार हे बदलत गेले. आता तशी परिस्थिती नाही. आज आपल्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखले जात आहे. आपला देश क्रिकेट, बॉलिवूड, स्टार्टअप युनिकॉर्न आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यासाठी ओळखला जाऊ लागला आहे. आता या महान देशासाठी कोणती गोष्ट मोठी आहे? तर ते अजून सोने, रौप्य आणि कांस्यपदक जिंकणे हे असेल. ”
From dreams to medals.🏅
It’s time to back our athletes as they step foot into Paris!✊🏼🇮🇳@IIS_Vijayanagar @StayWrogn #JaiHind #WeAreTeamIndia #Paris2024 #RoadToParis2024 #StayWrogn pic.twitter.com/pbi7TYWjsN— Virat Kohli (@imVkohli) July 15, 2024
कोहलीने भारतातील क्रीडाप्रेमींना 118 सदस्यीय भारतीय ऑलिम्पिक तुकडीला पाठिंबा देण्यास सांगितले आहे. त्यानं पुढे म्हटले आहे की, “आपले खेळाडू पदक जिंकण्यासाठी पॅरिसला जात आहेत. आपले ॲथलीट ट्रॅक आणि फील्ड आणि कोर्ट आणि रिंगमध्ये पाय ठेवत असताना अब्जावधी भारतीय लोक त्यांना उत्साहाने पाहत असतील, त्यावेळी ‘इंडिया-इंडिया’चा नारा प्रत्येक चौका-चौकात गुंजेल. माझ्यासोबत, तुम्हालाही ते चेहरे आठवतील जे तिरंगा ध्वज फडकवण्याच्या निर्धाराने व्यासपीठावर अभिमानाने येतील. भारतीय संघाला जय हिंद आणि शुभेच्छा.”
यावेळी भारत पॅरिस ऑलिम्पिकसाठी 100 हून अधिक खेळाडूंचा संघ पाठवत असून प्रत्येकाकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. भारताचे बहुतांश खेळाडू सध्या परदेशात सराव करत असून तेथून ते पॅरिसला पोहोचणार आहेत. नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती आणि बॉक्सिंग याशिवाय टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राकडून भारताला पदकांची आशा आहे.





