Border-Gavaskar Trophy 2024/25 | विराट कोहलीने सचिनकडून प्रेरणा घ्यावी – सुनील गावस्कर

Sunil Gavaskar Advice To Virat Kohli :- ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताची आघाडीची फळी पुन्हा उध्वस्त झाली. यामध्ये सर्वात जास्त अपेक्षा असलेला विराट कोहलीने केवळ 3 धावाच करता आल्या. पर्थ वगळता कोहलीला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. तो सातत्याने ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळताना बाद होत आहे. त्यामुळेच कोहलीने सिडनी येथे 2004 मध्ये सचिन तेंडुलकरने केलेल्या शानदार खेळीतून प्रेरणा घेऊन ऑफ-स्टंपबाहेरील चेंडूंचा त्रास दूर करावा, असा सल्ला माजी क्रिकेटपटू व समालोचक असणाऱ्या सुनील गावस्कर यांनी दिला.
गेल्या काही महिन्यानापासून विराट कोहली धावांसाठी झगडत आहे. त्याने पर्थ कसोटीमध्ये दुसऱ्या डावात धडाकेबाज शतकी खेळी केली होते. त्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पर्थ कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर मात्र, पुन्हा तो ऍडलेड व ब्रिस्बेन येथील कसोटीच्या पहिल्या डावात ऑफ स्टम्पवरील चेंडू ड्राइव्ह करताना बाद झाला आहे. त्याने मागील 4 डावांमध्ये केवळ 15 धावांचा टप्पा देखील पार करू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध वेगवान गोलंदाजीसमोर त्याची कमजोरी अधोरेखित झाली.
कोहली बाद झाल्यानंतर गावस्कर माध्यमांशी बोलताना म्हणाले, विराट कोहली एका विशिष्ट प्रकारे बाद होत आहे. हेझलवूडने त्याला बाहेर जाणारा चेंडू खेळण्यासाठी प्रवृत्त केले. कोहलीने देखील तो चेंडू खेळाला, ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळून कोहली बाद झाला. याच समस्येतून सचिन तेंडुलकर देखील 2004 साली गेला होता. पहिल्या तीन कसोटीमध्ये तो स्टंपच्या बाहेरच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो स्लिप आणि गलीमध्ये बाद झाला, असे ते म्हणाले.
त्यानंतर सचिनने कव्हरमध्ये फटके मारले…
ते पुढे म्हणाले, आपली चूक लक्ष्यात आल्यानंतर सचिनने सिडनी येथील मैदानात आल्यानंतर कव्हर क्षेत्रात काहीही न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने कव्हर सोडून बाकी मैदानावर इतरत्र फटके मारले. त्यामुळे अडचण असणाऱ्या ठिकाणाकडे त्याने पूर्ण दुर्लक्ष्य करताना आपली खेळी केली. त्या प्रमाणे ठरवले, त्या प्रमाणेच त्याने फलंदाजी केली. त्याने 200 धावांचा टप्पा पार केल्यानंतर आत्मविश्वासाने कव्हरमध्ये फटके मारले. अशा प्रकारचे तुमच्याकडे मनावर नियंत्रण आवश्यक आहे, असे गावस्कर म्हणाले.
NZ vs ENG : केन विल्यमसननं शतक झळकावून रचला इतिहास, अनेक मोठे विक्रम काढले मोडित; 147 वर्षात प्रथमच…
सराव वेगळा लढत वेगळी
भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीपूर्वी जोरदार सराव केला होता. सराव वेगळा आणि लढत वेगळी. सराव करताना तुमची मानसिकता वेगळी असते. तुम्हाला माहिती असते, तुम्ही सरावात एखादा वाईट फटका मारलात, तर त्यातून तुम्ही बचावले जाऊ शकता. मात्र, सामन्यात तुम्ही वाईट फटका मारला, तर तुम्हाला पुन्हा संधी मिळत नसल्याचे गावस्कर बोलताना म्हणाले





