#IPL2022 | ऋतुराजला कोहलीचा पाठिंबा, म्हणाला” त्याला काही वेळ….”
Updated On:

मुंबई – वैयक्तिक कामगिरी सरस होत नसतानाही विराट कोहलीने ऋतुराज गायकवाडच्या गुणवत्तेचे कौतुक केले असून, त्याला पाठिंबाही दिला आहे. कोहली रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा खेळाडू आहे, तर ऋतुराज चेन्नई सुपर किंग्जचा. मात्र, असे असले तरीही ऋतुराज भविष्यातील भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरेल, असे सांगत कोहलीने त्याला काही वेळ देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
यंदाच्या मोसमात ऋतुराज सातत्याने अपयशी ठरत आहे. या दोन संघांतील सामना संपल्यावर कोहलीने ऋतुराजला धीर देत काही टिप्स दिल्या. ऋतुराज हा गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने तब्बल 635 धावा केल्या होत्या. मात्र, यंदाच्या मोसमात त्याला अपयश येत आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांत मिळून त्याला एकूण केवळ 35 धावा करता आल्या आहेत.





