Boxer Sakshi Chaudhary : “विराट कोहली माझ्यासाठी प्रेरणास्थान, तीन वर्षांपासून…”; सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरी नेमकं काय म्हणाली?
Boxer Sakshi Chaudhary : स्टार क्रिकेटर विराट कोहली हा बॉक्सर साक्षी चौधरीचा फक्त स्पॉन्सर नाही तर तिचा आदर्श सुद्धा आहे. इतर दिग्गज खेळाडूंप्रमाणेच साक्षीने विराट कोहलीकडून प्रेरणा घेतल्याचं यावेळी बोलताना तिने सांगितलं.

Boxer Sakshi Chaudhary : ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकून उत्तम कामगिरी केलेल्या हरियाणाच्या साक्षी चौधरीने मीडियासोबत संवाद साधताना स्टार क्रिकेटर विराट कोहलीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मीडियाशी बोलताना साक्षीने विराटचा उल्लेख करत त्याचं आपल्या करिअरमध्ये महत्वाचं योगदान असल्याचं स्पष्ट केलं. ती म्हणाली “विजेंदर सिंग यांना पाहून मी बॉक्सिंगकडे वळले, पण माझ्या या प्रवासात विराट कोहलीने मला खूप साथ दिली आहे. ते माझे स्पॉन्सर राहिले त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानेल.”
स्टार क्रिकेटर विराट कोहली हा बॉक्सर साक्षी चौधरीचा फक्त स्पॉन्सर नाही तर तिचा आदर्श सुद्धा आहे. इतर दिग्गज खेळाडूंप्रमाणेच साक्षीने विराट कोहलीकडून प्रेरणा घेतल्याचं यावेळी बोलताना तिने सांगितलं.
नेमकं विराटविषयी साक्षी काय म्हणाली?
“विराट कोहली माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. मी त्याच्याकडून आणि त्याच्या प्रवासातून प्रेरणा घेते. तो गेल्या तीन वर्षांपासून माझा प्रायोजकही आहे, त्यामुळे तो माझ्यासाठी एक आदर्शही आहे. त्याने मला सांगितलं की त्याला कोणताही दबाव जाणवत नाही; तो केवळ आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. रिंगमध्ये उतरताना हाच विचार माझ्या मनात असतो.”

ग्लास्गोत भारतीय बॉक्सरांची ऐतिहासिक सुवर्णवृष्टी! साक्षी चौधरी अन् प्रियाचा सुवर्ण धमाका; बॉक्सिंगमध्ये भारताला ४ ‘गोल्ड’
ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये साक्षी चौधरीने बॅाक्सिंगमध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय बॉक्सरांनी दमदार आणि ऐतिहासिक कामगिरी करत एकूण १० पदकांची कमाई केली. यामध्ये ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंच्या या शानदार प्रदर्शनामुळे भारताच्या पदकतालिकेतील स्थानाला मोठी बळकटी मिळाली.
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये प्रीति पवार (५४ किलो), जॅस्मीन लेम्बोरिया (५७ किलो), साक्षी चौधरी (५१ किलो), प्रिया घनघस (६० किलो), अरुंधति चौधरी (७० किलो), सचिन सिवाच (६० किलो) आणि अंकुश पंघाल (८० किलो) यांचा समावेश आहे. तर लवलीना बोरगोहेन (७५ किलो), जदुमणि सिंह (५५ किलो) आणि नरेंद्र बेरवाल (९०+ किलो) यांनी रौप्यपदक पटकावले.
दरम्यान, भारताने कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण ३९ पदकं जिंकली आहेत. यात १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश असून पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतीय बॉक्सरांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाच्या पदकसंख्येत मोठी भर पडली आहे.
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी





