Virat Gifts Jersey : टीम इंडियाचा धुव्वा उडवणाऱ्या मॅट हेन्रीला किंग कोहलीचं सरप्राईज; ड्रेसिंग रूमबाहेर भेट घेत दिलं खास गिफ्ट, VIDEO होतोय व्हायरल!
Virat Gifts Jersey : सामन्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाच्या पडझडीस कारणीभूत ठरलेल्या वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला आपली जर्सी गिफ्ट केली. तसेच त्याच्या कामगिरीचे कौतुकही केले.

Virat Kohli Gifts Indian Jersey To Matt Henry Viral Video 4th ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला २४४ धावांच्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ३३४ धावांचा पाठलाग करताना किवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने भारतीय फलंदाजीची दाणादाण उडवत ६ विकेट्स घेतल्या. या लाजिरवाण्या पराभवाच्या कटुतेनंतरही भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मनं जिंकली आहेत. सामना संपल्यानंतर कोहलीने मॅट हेन्रीच्या अविस्मरणीय गोलंदाजीचे कौतुक करत त्याला आपली स्वाक्षरी केलेली भारतीय जर्सी भेट दिली.
ड्रेसिंग रूमबाहेर कोहलीने हेन्रीचे केले कौतुक; व्हिडीओ तुफान व्हायरल –
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सामन्यानंतरचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली ड्रेसिंग रूमजवळ जाऊन मॅट हेन्रीची भेट घेताना दिसत आहे. भारताला खोल जखम देणाऱ्या या गोलंदाजाला कोहलीने खिलाडूवृत्तीने मिठी मारत उत्कृष्ट कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि खास भेट म्हणून स्वतःची टीम इंडियाची जर्सी सोपवली. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
पहिल्याच षटकात केला होता कहर; भारत ८९ धावांत गारद
View this post on Instagram
तत्पूर्वी, मॅट हेन्रीने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना शून्यावर बाद करत भारताचे कंबरडे मोडले होते. या धक्क्यातून टीम इंडिया शेवटपर्यंत सावरू शकली नाही. ज्यामुळे भारतीय संघ अवघ्या २६.४ षटकांत ८९ धावांत गारद झाला.
इशान किशनची एकाकी झुंज; रविवारी रंगणार निर्णायक महामुकाबला
🔴🤯 VIRAT KOHLI GIFTS HIS JERSEY TO MATT HENRY! 🏏👏
After a sensational bowling performance, Matt Henry received a special gesture from none other than Virat Kohli. 🇮🇳🤝🇳🇿
🎙️ Virat Kohli: “Quality bowling, enough for today!” 😭😂
🔥 A brilliant moment of respect between two world-class cricketers!
👏 Matt Henry’s outstanding spell proved too much for India, and Kohli’s gesture showed the true spirit of the game. ❤️🏏
RESPECT THE PERFORMANCE. RESPECT THE GAME. 🙌🔥
#ViratKohli #MattHenry #INDvNZ #Cricket #SpiritOfCricket 🏏❤️
— The Cricket🏏Village 🇬🇧🇵🇰🇦🇺🇮🇳🇿🇦🇧🇩🇱🇰 (@MSohailAfzal10) November 13, 2026
हेन्रीने पुढे सर्वाधिक २७ धावा करणाऱ्या इशान किशनसह कुलदीप यादव आणि गुरनूर ब्रार यांना बाद करत ६ विकेट्स पूर्ण केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ ने आघाडीवर असून, आता येत्या रविवारी मालिकेचा पाचवा आणि अंतिम निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.





