Virat Kohli | Bengaluru – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नव्या अडचणीत सापडला आहे. ब्रुहद-बेंगळुरू महानगरपालिकेने बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळील ‘वन 8 कम्युन पब आणि रेस्टॉरंट’ला नोटीस बजावली आहे. वास्तविक, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना न राबवून उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश यांनी अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत निष्काळजीपणाची तक्रार महापालिकेकडे केली होती. यावर बीबीएमपीने बारला नोटीस बजावली. अग्निसुरक्षेची अंमलबजावणी झाली नसल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्रही मिळालेले नाही. विराट कोहलीच्या वन 8 कम्युनच्या दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये शाखा आहेत. बेंगळुरू पब गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाला होता. हे एम चिन्नास्वामी स्टेडियमला लागून असलेल्या कस्तुरबा रोडवरील रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर हा पब आहे. यापूर्वीही रेस्टॉरंट आले होते चर्चेत ! याआधीही हे रेस्टॉरंट चर्चेत आले आहे. जुलैमध्ये पोलिसांनी वन 8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी हा बार उघडून ग्राहकांना सेवा देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या एका उपनिरीक्षकाला वन 8 कम्युन बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची खबर मिळाली होती. पहाटे 1:20 वाजता उपनिरीक्षक आले तेव्हा त्यांना बार ग्राहकांना सेवा देत असल्याचे दिसले. त्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला होता.