काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Updated On:

भोपाळ – काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत सापडला असून अनेक राज्यांत काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. संघटनावर झालेल्या परिणामुळे काँग्रेसला अपयश येत असल्याचे मत अनेकजन व्यक्त करतात. त्यातच आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे समजते. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

काँग्रेस कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी भोपाळ बंदच्या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक नेते आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. त्याचवेळी माजी महापौर विभा पटेल यांचे समर्थक आणि धर्मेंद्र राय यांच्या एका कार्यकर्त्यांमध्ये मारहाण सुरू झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र या वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्हिडिओमध्ये  कार्यकर्ते एकमेकांशा शिव्या देत आहे आणि मारहाण करीत आहे. या घटनेनंतर तातडीने तेथील मीडिया कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर पाठविण्यात आलं. आणि अशा प्रकारचं कव्हरेज करण्यापासून रोखलं.  एका महिन्यापूर्वी मंदसोर काँग्रेस कार्यालयातदेखील असाच प्रकार समोर आला होता.

आणखी संबंधित बातम्या

MP IAS Transfer : 32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिका आयुक्तही बदलले

2026-08-21 17:58:38

MP IAS Transfer : 32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिका आयुक्तही बदलले

India-Nepal border : भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक; नेपाळ हिंसाचारानंतर प्रशासनाचा निर्णय

2026-08-01 15:37:08

India-Nepal border : भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक; नेपाळ हिंसाचारानंतर प्रशासनाचा निर्णय

CJP protest: हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय ; CJP आंदोलनप्रकरणी 5 गुन्हे दाखल

2026-07-21 13:21:06

CJP protest: हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय ; CJP आंदोलनप्रकरणी 5 गुन्हे दाखल

Loni Kalbhor Crime : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध! मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपी अटकेत

2026-05-30 04:15:36

Loni Kalbhor Crime : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध! मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपी अटकेत

Twisha Sharma case: "मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला चांगला"; ट्विशा शर्मा प्रकरणात वकिलाचं मोठं विधान

2026-05-25 14:56:52

Twisha Sharma case: "मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला चांगला"; ट्विशा शर्मा प्रकरणात वकिलाचं मोठं विधान