“प्रियंका गांधी दुर्गा आणि शक्तीचे स्वरूप”

जुलाना – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या दुर्गा आणि शक्तीचे स्वरूप आहेत. तुमची ही मुलगी राज्याच्या विधानसभेत गेली तर ती तुमच्या हक्काचा आवाज बनेल असे कॉंग्रेसच्या हरियाणातील जुलाना मतदारा संघातील उमेदवार विनेश फोगटने म्हटले आहे. जुलना विधानसभा नवा इतिहास रचणार असल्याचा दावाही विनेशने केला.
जेव्हा तुमची मुलगी जंतरमंतरवर उपोषणाला बसली होती, तेव्हा प्रियंका गांधी आम्हाला मोठी बहीण म्हणून भेटायला आल्या होत्याजे धैर्य आणि प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि ते दुःख लपवू शकत नाही. ती वेदना आम्ही बहिणीला सांगितल्यावर त्यांचा हात माझ्या डोक्यावर राहिला. आजही त्या हाताची ताकद मी माझ्या डोक्यावर अनुभवू शकते. माझ्या ऑलिम्पिकला जाण्यात प्रियंका गांधी यांची मोठी भूमिका असल्याचे ती म्हणाली.
मी लहानपणापासून जो संघर्ष केला त्यात संपूर्ण देश माझ्या पाठीशी उभा आहे. लोकांनी दाखवलेली उर्जा आणि कुस्ती क्षेत्रात मला दिलेला आदर आणि प्रेम यामुळे मी तुम्हाला खात्री देते की तुम्ही जसे माझ्या पाठीशी उभा राहिलात तसेच मी तुमच्या सुख-दु:खाच्या, हक्काच्या लढ्यात तुमच्या दोन पावले पुढे उभी राहीन.
मी ज्यावेळी बाहेर निघते तेव्हा जनतेचे प्रेम, माझा पाठिंबा वाढत चालला आहे. मी खात्रीने सांगू शकते की तुमची मुलगी ना कुणापुढे झुकली ना कधी कुणापुढे झुकणार असा शब्द विनेशने दिला.





