कुस्तीपटू विनेश फोगटवर भारत सरकारने किती पैसे खर्च केले? क्रीडामंत्र्यांनी लोकसभेत दिला पूर्ण हिशोब

नवी दिल्ली – विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने वाढले होते, त्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले. या बातमीने देशभरात नाराजी पसरली आहे. (Vinesh Phogat Disqualified)
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरवल्याच्या प्रकरणावर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत माहिती दिली.
विनेश फोगटला न्याय मिळेल : क्रीडामंत्री
मनसुख मांडविया म्हणाले, “आज तिचे (विनेश फोगट) वजन 50 किलो 100 ग्रॅम असल्याचे आढळून आले आणि तिला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती संघातही विरोध दर्शवला आहे.”
#WATCH | Union Sports Minister Mansukh Mandaviya speaks on the issue of disqualification of Indian wrestler Vinesh Phogat from #ParisOlympics2024
He says, “…Today her weight was found 50 kg 100 grams and she was disqualified. The Indian Olympic Association has lodged a strong… pic.twitter.com/7VkjoQQyIM
— ANI (@ANI) August 7, 2024
क्रीडा मंत्री पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पीटी उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. आम्हाला आशा आहे की न्याय मिळेल. क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, विनेश फोगटला सरकारकडून कोणत्या प्रकारे मदत करण्यात आली.
विनेशला मदतीसाठी सरकारने काय केले?
मनसुख मांडविया म्हणाले, सरकारने विनेश फोगटला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांच्यासाठी वैयक्तिक कर्मचारी नेमण्यात आले होते. प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील तैनात होते. अनेक स्पॅरिंग भागीदार, स्ट्रेंथ कंडिशनिंग तज्ञांना पैसे दिले गेले.
मांडवीय यांनी यावेळी त्याची सविस्तर माहिती दिली. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने विनेशवर 70 लाख 45 हजार रुपये खर्च केल्याची माहिती क्रीडामंत्र्यांनी दिली. त्यांनी सांगितले विनेशला प्रशिक्षणासाठी परदेशातही पाठवण्यात आले होते.




