अखेर विजय रुपाणी यांचा DNA मॅच ; आज सायंकाळी कुटुंबीयांकडे पार्थिव करणार सुपूर्द

Vijay Rupani DNA match । गुजरातमधील अहमदाबाद विमान अपघातात बळी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची डीएनए चाचणी जुळली आहे. गृहमंत्री हर्ष संघवी यांनी डीएनए जुळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव कुटुंबीयांना सोपवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या त्याच विमानात विजय रुपाणी होते. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच विमान कोसलळे होते. विमानात २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली. या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. Vijay Rupani DNA match ।
दरम्यान, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी म्हणाले की, मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि राज्य सरकारकडून बाधित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
राकेश जोशी यांनी माहिती देताना, अपघाताची बातमी मिळताच, रुग्णालयातील २५० हून अधिक डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या पथकाने तातडीने मदत आणि उपचारांची जबाबदारी घेतली, ज्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकले. जखमींवर वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यात आले आणि मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने जुळवण्याचे काम फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने केले जात आहे. Vijay Rupani DNA match ।
हेही वाचा
अहमदाबाद विमान अपघात कसा झाला? समोर आले मोठे कारण ; सरकारने चौकशीसाठी दिली ३ महिन्यांची मुदत





