Thalapathy Vijay : विजय-संगीता यांच्या नात्यात नवे वळण.! “त्यांचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध….”; संगीता यांनी अखेर सांगूनच टाकलं, कोर्टात काय घडलं?
संबंधित अभिनेत्रीबरोबर विजय परदेश दौरे करत होते, सार्वजनिक कार्यक्रमांनाही तिच्यासोबत उपस्थित राहत होते आणि त्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर परदेशातील छायाचित्रेही शेअर केली होती.

Thalapathy Vijay | Sangeeta Sornalingam : तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय (Vijya) यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या घटस्फोट प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे. (Thalapathy Vijay)
संगीता यांनी तमिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतली असून, त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाने निकाली काढले आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांच्या वैवाहिक नात्याला पुन्हा एक संधी मिळाल्याची चर्चा रंगली आहे. Thalapathy Vijay
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता सोर्नालिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन सुनावणीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी स्वतःहून घटस्फोटाची याचिका मागे घेण्याचा निर्णय न्यायालयासमोर मांडला. त्यानंतर न्यायालयाने त्यांची विनंती स्वीकारत हे प्रकरण बंद केले. (Thalapathy Vijay)

Thalapathy Vijay : विजय-संगीता यांच्या नात्यात नवे वळण.! “त्यांचे एका अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध….”; संगीता यांनी अखेर सांगूनच टाकलं, कोर्टात काय घडलं?
माध्यमांतील वृत्तानुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संगीता यांनी चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी विजय यांच्याशी असलेले वैवाहिक नाते कायदेशीररीत्या समाप्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली.
१५ जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान संगीता यांनी याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळीही त्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच न्यायालयात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ७ ऑगस्टची तारीख निश्चित केली होती. अखेर आज त्यांनी अधिकृतपणे याचिका मागे घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
सुनावणीदरम्यान दोघेही अनेकदा गैरहजर : (Thalapathy Vijay)
गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीला विजय आणि संगीता या दोघांपैकी कोणीही न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळीही दोघे अनुपस्थित होते. त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला वैयक्तिक कारणांमुळे दोघांनाही उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले होते.
याचिकेत विजय यांच्याविरोधात गंभीर आरोप : (Thalapathy Vijay)
फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत संगीता यांनी विजय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, विजय यांचे एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्याची माहिती आपल्याला २०२१ मध्ये मिळाली होती.
याचिकेनुसार, या संबंधांबाबत विचारणा केल्यानंतर विजय यांनी ते संबंध संपवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसे झाले नाही. संबंधित अभिनेत्रीबरोबर विजय परदेश दौरे करत होते, सार्वजनिक कार्यक्रमांनाही तिच्यासोबत उपस्थित राहत होते आणि त्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर परदेशातील छायाचित्रेही शेअर केली होती. या सर्व प्रकारामुळे स्वतःचा तसेच मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या साशा यांचाही वारंवार अपमान झाल्याचा आरोप संगीता यांनी केला होता.
मानसिक त्रास, अपमान आणि पोटगीची मागणी :
याचिकेत संगीता यांनी असेही नमूद केले होते की, विजय यांच्या कथित वर्तनामुळे आणि २०२४ मध्ये सोशल मीडियावर झालेल्या विविध वादांमुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. वैवाहिक नाते केवळ कागदोपत्री उरले असून, या नात्यातून फक्त वेदना, अपमान आणि मानसिक क्लेश मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता.
त्याचबरोबर त्यांनी दोघांमधील मतभेद कधीही मिटू शकणार नाहीत, असे सांगत कायमस्वरूपी पोटगीची मागणी केली होती. तसेच चेन्नईतील नीलांकरई येथील वैवाहिक घरात राहण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागितली होती.
विजय आणि संगीता यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी चेन्नई येथे पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह केला होता. या दाम्पत्याला २००० मध्ये मुलगा जेसन संजय आणि २००५ मध्ये मुलगी दिव्या साशा झाली. सध्या संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याने या प्रकरणाचा न्यायालयीन शेवट झाला असला, तरी त्यांच्या या निर्णयामागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






