Vijay and Rashmika: विजय आणि रश्मिकाचा जपानमध्ये रोमॅंटिक अंदाज
Vijay and Rashmika : दोघांनी कुटुंबासोबत केला एंजॉय

Vijay and Rashmika : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या कुटूंबासोबत सध्या जपानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. विजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जपानमधील काही खास क्षण शेअर केले आहेत. विजयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे आणि रश्मिकाचे काही रोमँटिक क्षण पाहायला मिळत आहेत.
एका फोटोत विजय रश्मिकाच्या खांद्यावर डोके ठेवून निवांत क्षण घालवताना दिसत आहे. या फोटोला त्याने ‘होम’ असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तो रश्मिकाला प्रेमाने मिठी मारताना दिसत असून, त्याला ‘लव्ह’ आणि ‘होम’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
विजयच्या या दोन शब्दांनी चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या फोटोंमधून दोघांमधील खास नाते आणि एकमेकांसोबतचा आनंदी वेळ स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय कुटुंबासोबत घालवलेला निवांत वेळही पाहायला मिळत आहे.
विजयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुटुंबीयांसोबत रंगकाम करण्याचे क्षण, कॉफी आणि मॅचा पिण्याचे ब्रेक तसेच जपानमधील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाचे फोटो आहेत. त्यांच्या या साध्या आणि आनंदी क्षणांना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
हेही वाचा :





