Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा देशमुखांचीच सत्ता; काँग्रेसचा भाजपला ‘दे धक्का’
Latur District Bank Election : धीरज देशमुख यांचा विजय

Latur District Bank Election : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमधील जिल्हा बँकेची निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीत १५ पैकी सहकार पॅनलचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर परिवर्तन पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे जिल्हा बँकेवरील सहकार पॅनलचे वर्चस्व कायम राहिले आहे.
१९ पैकी ४ जागा बिनविरोध
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या १९ पैकी १५ जागांवर रविवार मतदान झाले होते. लातूर जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १५ जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत तब्बल ९९.४० टक्के इतकं विक्रमी मतदान झालं होतं.
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दोन्ही पॅनलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र या अटीतटीच्या सामन्यात काँग्रेसनं जोरदार विजय मिळवला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून जिल्हा बँकेवर सुरेश देशमुख यांच्या सहकार पॅनलची सत्ता आली आहे.
काकी – पुतण्या लढत
भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव करत पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केला आहे.
पाच जागांवर परिवर्तन पॅनल विजय
पाच ठिकाणी परिवर्तन पॅनल विजय मिळवला आहे. यात संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर विजयी झाले आहेत. तर त्यांनी त्यांची काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. तर भाजपचे आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अशोक गोविंदपुरकर यांचा पराभव केला आहे.
धीरज देशमुख यांचा विजय
सोबतच सहकार पॅनलचे धीरज देशमुख विजय झाले आहेत. स्वर्गीय माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले या विजयी झाल्या आहेत. तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव हे सहकार पॅनल मधून विजय झाले आहे.
दरम्यान, विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँक घेतली ताब्यात घेतली. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या परिवर्तन पॅनलला मागे टाकले आहे.
हेही वाचा:





