Vihaan face reveal: पिवळा ड्रेस अन् चेहऱ्यावर गोड स्माईल… कतरिना-विकी कौशलच्या मुलाचा पहिला फोटो चाहत्यांच्या पसंतीस
Vihaan face reveal : दिवाळीनिमित्त दोघांनी एकत्र येत त्यांच्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला

Vihaan face reveal : अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती अभिनेता विकी कौशल मागील वर्षी आई-बाबा झाले. कतरिना कैफने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव विहान असे ठेवले.
मात्र त्याच्या जन्मापासून कधीही कतरिना आणि विकीने मुलाची झलक दाखवली नव्हती. अखेर दिवाळीनिमित्त दोघांनी एकत्र येत त्यांच्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
दिवाळीच्या निमित्ताने कतरिना व विकीने त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. कतरिना, विहान आणि विकी तिघांनीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. विकी व कतरिनाने विहानला पकडले आहे. ते त्याच्याकडे बघून हसताना दिसत आहेत. तर विहानही हसत असल्याचे दिसत आहे. तिघेही पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसत आहेत.
हा सुंदर फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले, “आमची आतापर्यंतची सर्वात आनंदाने उजळलेली दिवाळी आहे. सर्वांना खूप आनंद, प्रेम मिळो, या शुभेच्छा.” कतरिना व विकीच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत कौतुक केले आहे.
हेही वाचा:
Almonds Side Effects: बदाम खाण्याचे फायदे माहिती आहेत, पण अतिसेवनाचे धोके माहिती आहेत का?





