नयनतारा विघ्नेशचा घटस्फोट होणार ?

Vignesh Shivan Nayanthara । साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नयनतार लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नयनताराने तिचा पती निर्माता विघ्नेश शिवनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहे.
घटस्फोटाचा चर्चांवर आता नयनताराच्या पतीने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत घटस्फोटाचा चर्चांवर आपली भूमिका मांडली आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान विघ्नेशने आपल्या पत्नीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून सर्वांना अवाक केले आहे. त्याने नयनताराचा इन्स्टा स्टोरीवर लेटेस्ट फोटोशूटचा शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फुलांनी सजवलेल्या बेडवर झोपलेली दिसत आहे. आता बातम्या येत आहेत की नयताराने पुन्हा तिच्या पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.
2015 मध्ये ‘नानुम राउडी’च्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 2021 मध्ये लग्न केलं. 2022 मध्ये या जोडप्याने मोठ्या थाटामाटात लग्न केले. आणि त्यांच्या लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतर, नयनतारा आणि विघ्नेश यांनी सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचे स्वागत केले.
दोघेही अनेकदा एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करताना दिसतात. अलीकडे, व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी, विघ्नेशने नयनतारासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आणि तिला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा
शाहरुख खानने साऊथच्या सुपरस्टारला म्हटले ‘इडली-वडा’; चाहते संतापले






