#Video:”खरं सांगा, काल मृत्यू उष्मघाताने झाले की चेंगराचेंगरीत?” ; जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ शेअर करत सरकारला केले सवाल

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. मात्र या सोहळ्यात उष्माघाताने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
खरे सांगा …
काल खरच किती जण मृत्युमुखी पडले …
…..
मृत्यू उष्मघातानी की चेंगराचेंगरीत ….
…..
आयोजक सरकार होते … लपवा लपवी करू नका
……
जबाबदारीचा स्वीकार करा …
……
cctv footage ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा
……
उच्च न्यायालयाच्या न्यायदिशा चा चौकशी आयोग नेमावा….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2023
जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून यात त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. ट्विटमध्ये,महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा चौकशी आयोग नेमावा अशी मागणी आव्हाडांनी केली. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांनी अन्य एका ट्वीटमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतील चेंगराचेंगरीची घटना कुठे घडली? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
समाज माध्यमां मधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा ? pic.twitter.com/J6QMWKKDeP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2023
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी, “समाज माध्यमांमधून हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोर्फ केलेला नाही. कारण यामध्ये महाराष्ट्र शासनाची गाडी दिसतेय. हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी अन्य एका ट्वीटमध्ये विचारला. संबंधित व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.





