VIDEO: ठाकरे सरकारचा महाशपथविधी सोहळा
Updated On:

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
तसेच शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच काँग्रेसने नेते आमदार बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.





