VIDEO : तापसी पन्नूचा बिकिनी लूकमधील हॉट अंदाज

मुंबई – अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. तेथील काही फोटो आणि व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तिचे बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ती नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे, हे समजू शकलेले नाही.
View this post on Instagram
तापसीने इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर धावताना दिसत आहे. यासोबतच ती पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्रात डुबकी मारतानाही दिसते. सध्या तिच्या या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओला तिने ‘Miami you beauty ‘ असे कॅप्शन दिले आहे. यासोबतच तापसीने तिचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, तापसी पन्नूचा बऱ्याच दिवसांपासून कोणताही चित्रपट आलेला नाही. तिचा शेवटचा चित्रपट ‘ब्लर’ हा होता, जो OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाला. आगामी प्रोजेक्ट्समध्ये तिच्याकडे ‘हसीना दिलरुबा’चा सिक्वेल आणि ‘धक धक’ नावाचा चित्रपट आहे.





