#video :“सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं”; विजय शिवतारेंचा गंभीर आरोप

Updated On:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.  शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोप देखील शिवतारे यांनी केला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला.. अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी महादेव आणि सासवडला सोपणकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असे शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या देवदर्शनावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता जात आहे.

तर गेल्यावर्षी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नॉनव्हेज खाल्ल्याने दगडूशेठ गणपतीचे बाहेरुनच दर्शन घेतलं. नॉनवेज खाल्लं असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली होती.

आणखी संबंधित बातम्या

MPSC Protest: "रोहित पवार एकटे पडले का?" एमपीएससी आंदोलनाला फक्त काँग्रेसची साथ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गायब

2026-10-05 05:30:22

MPSC Protest: "रोहित पवार एकटे पडले का?" एमपीएससी आंदोलनाला फक्त काँग्रेसची साथ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गायब

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला ! 'या' अधिकाऱ्याची केली बदली

2026-10-02 16:31:28

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला ! 'या' अधिकाऱ्याची केली बदली

Baramati News: बारामतीचा जिरायती पट्टा अजूनही तहानलेलाच! तलाव-तळे कोरडे , पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल

2026-09-29 03:15:31

Baramati News: बारामतीचा जिरायती पट्टा अजूनही तहानलेलाच! तलाव-तळे कोरडे , पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

2026-09-26 18:42:55

Supriya Sule : रस्ते अडवू नका, मंत्र्यांची वाहने अडवा; सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Anil Bonde: दुष्काळावरून राजकारण तापलं! अनिल बोंडेंचा सुप्रिया सुळे, शरद पवारांवर हल्लाबोल

2026-09-26 15:49:09

Anil Bonde: दुष्काळावरून राजकारण तापलं! अनिल बोंडेंचा सुप्रिया सुळे, शरद पवारांवर हल्लाबोल