Sidharth-Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; पापाराझींना केले महत्त्वाचे आवाहन
Sidharth Malhotra Kiara Advani : मुलीच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची त्यांची अपेक्षा

Sidharth-Kiara: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडिया पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र अद्यापही दोघांनी त्यांची पहिली मुलगी सरायाह हिचा चेहरा दाखवलेला नाही.
सिद्धार्थ आणि कियारा यांनी आपल्या मुलीला आतापर्यंत प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतानाही त्यांनी तिचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली आहे. (Sidharth-Kiara)
मात्र अलिकडेच सिद्धार्थ-कियाराचा लेकीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात तिचा चेहरा दिसत असून कियारा झाकण्याचा प्रयत्न करते. यानंतर आता सिद्धार्थ आणि कियारा यांनी मीडिया, पापाराझींना महत्त्वाचे आवाहन केले आहे. (Sidharth-Kiara)

Sidharth-Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; पापाराझींना केले महत्त्वाचे आवाहन
सरायाहचा हा व्हिडीओ पुढे शेअर करू नये. तसेच, कोणाला हा व्हिडीओ शेअर करायचाच असल्यास त्यामध्ये मुलीचा चेहरा इमोजी किंवा ब्लरच्या मदतीने झाकावा, असे त्यांनी सांगितले आहे. आपल्या मुलीची ओळख आणि खासगी आयुष्य जपण्याचा या जोडप्याचा प्रयत्न आहे. आपल्या मुलीच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, हीच त्यांची अपेक्षा आहे. (Sidharth-Kiara)
दरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा यांनी १५ जुलै २०२५ रोजी आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले.पालक झाल्यानंतर दोघांनीही मुलीला माध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तिच्या प्रायव्हसीची काळजी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र आता लेकीच्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा हे जोडपे चर्चेत आले आहे.
हेही वाचा :
Neha Dhupia : मातृत्वानंतर नेहा धुपियामध्ये काय बदल झाला? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा म्हणाली…





