बलात्कार प्रकरणात वादग्रस्त माजी IPS अधिकारी अमिताभ ठाकूर यांचा अटकेचा व्हिडिओ व्हायरल

लखनऊ – उत्तरप्रदेशचे बाहुबली नेते मुख्तार अन्सारी यांच्या सांगण्यावरून बलात्काराच्या प्रकरणात आरोपी खासदार अतुल राय यांना वाचविण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर ठेवण्यात आला आहे. या आरोपावरून
यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
The police has forcibly taken @Amitabhthakur without any justification/ providing reasons to the Hazratganj police station.@Uppolice @dgpup pic.twitter.com/P0AlihDpfn
— AmitabhThakur (@Amitabhthakur) August 27, 2021
मात्र अटकेदरम्यान, ठाकूर यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला त्यांनी अटकेवेळी तेथून सुटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसानी अटक केली. या घटनेचा व्हिडियो सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होते आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
तत्पूर्वी, पीडित महिलेलने आणि तिच्या पुरुष मित्राने १६ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयासमोर फेसबुक लाईव्ह व्हिडिओ करत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेनं केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये अमिताभ ठाकूर यांच्यासहीत एसएसपी अमित पाठक, सीओ अमरेश सिंह, पोलीस अधिकारी संजय राय, त्यांचा मुलगा विवेक राय आणि माजी आयजी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.यामध्ये ती आणि आणि तिच्या सोबत मित्र गंभीररीत्या गंभीररित्या भाजल्यानं या दोघांचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
त्यानंतर या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना अटक करण्यात आली.





