VIDEO: खासदार राघव चढ्ढा आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री? रॅम्पवॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा हे दोघे सध्या चर्चेत आहेत. नुकतेच 13 मे 2023 रोजी या दोघांचा साखरपुडा झाला होता. मागील काही दिवसांपासून हे दोघे एकत्र दिसत असल्याने त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत कोणतीही माहिती न देता त्यांनी थेट साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आता राघव चढ्ढा यांचा एक रॅम्पवॉक करतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी राघव चढ्ढा यांनी केलेल्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावरून आता राघव चढ्ढा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या रॅम्पवॉकमध्ये राघव चढ्ढा यांनी लेदर जॅकेट घातले होते. वास्तविक, राघव चढ्ढा यांनी वर्षभरापूर्वी एका डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला होता. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
हे व्हिडिओ आणि फोटो पाहून चाहते नेटकरी राघव यांना ‘जिजाजी’ म्हणत चिडवताना दिसत आहेत. राघवच्या रॅम्प वॉकच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘जिजाजींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘जिजाजी हिरो बनू शकतात’.
Punjab MP @raghav_chadha during rajya sabha victory parade.
Modeling in #LakmeFashionWeek2022 week is a worse politcal stunt then our very own bhangra politicians??
This is the “Badlav” punjab wanted. #ArvindKejriwal pic.twitter.com/be8EZv1bVt— Brinder (@brinderdhillon) March 27, 2022
दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला येथे पार पडला होता. या साखरपुड्याला परिणीतीची बहीण प्रियांका चोप्रा आणि मनीष मल्होत्रा यांसारख्या काही दिग्गजांनीही हजेरी लावली होती. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवालसह अनेक राजकीय नेतेमंडळीही उपस्थित राहिले होते.





