मुंबई – अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ ही बॉलीवूडमधील चमकणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. जिने कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. क्रिती केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या फॅशन सेन्सनेही सर्वांना प्रभावित करते आहे. लवकरच क्रिती आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभासबरोबर दिसणार आहे. रामायणावरील या चित्रपटाचे डायरेक्शन ओम राऊत करणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे.
दरम्यान, आपल्या आगामी चित्रपटामुळे अभिनेत्री क्रिती सेननने सध्या चांगलीच चर्चेत आहेत. मात्र, अश्यातच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून तिच्या व्हिडिओने सर्वांचे मन जिंकले आहे. क्रितीने अलीकडेच फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये वास केला आहे. याआधीही असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी असा प्रवास केला आहे.
View this post on Instagram
पण क्रितीने नुसता प्रवासच नाही केला, तर त्या फ्लाइटमधील तिच्या कृतीने तिने सर्वांचे मन जिंकले. फॅन्सही तिचे खूप कौतुक करत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये क्रिती कशी प्रवास करत आहे ते तुम्ही पाहू शकता. मात्र, अभिनेत्रीने चेहऱ्यावर मास्क लावला आहे.
पण, या स्टाईलने या अभिनेत्रीने चाहत्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ज्यामध्ये ती विंडो सीटवर बसलेली आहे. यादरम्यान अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मास्क नाही. तसेच, ती तिच्या एका छोट्या चाहत्याशी बोलताना आणि मस्ती करताना दिसत आहे. तिचा हा अनोखा अंदाज पाहून चाहते देखील अभिनेत्रीच कौतूक करत आहे. सध्या क्रितीचा हा सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.