#video | कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून नदीपात्रात 36667 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Updated On:

पाटण – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. धरणात प्रतिसेकंद तब्बल 1 लाख 26 हजार 267 क्युसेक पाणी येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 82.98 टीएमसी झाला आहे. तर पाणी पातळी 2144.6 फूट झाली आहे.

धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सहा वक्र दरवाजातून आज सकाळी आठ वाजता 9 हजार 567 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे पायथा विद्युतगृह व वक्र दरवाजातून एकूण 11हजार 667 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले.

त्यामुळे कोयना नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुन्हा सकाळी दहा वाजता विसर्ग वाढवून पंचवीस हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे एकूण कोयना नदीपात्रात 36 हजार 667 क्युसेक सोडण्यात येत आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने हाहाकार माजवला आहे.

त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाला जल पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

परिणामी एकूण कोयना धरणातून 36 हजार 667 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर, कोयना या ठिकाणी रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पर्जन्यमापकानुसार मिलिमीटरमध्ये पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडा यावर्षीचा एकूण पाऊस. कोयना 610(2467), नवजा 746(3297), महाबळेश्वर 556 (3063) अशा रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे.

पाटणला पुराचा धोका
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणार्‍या पावसामुळे कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यातच कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाटण शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.

कराड- चिपळूण रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. नवीन बस स्थानक परिसर पाण्याखाली गेला आहे तर मुळगाव पुलानजीक असणारी कळके चाळ, रामापुरचा काही भाग तसेच केरा नदीच्या बाजूला बाजार समिती येथील काही भागात पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

महावितरणची वीज गायब

सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे ठिकठिकाणी विजेच्या खांबावर झाडे पडल्याने तसेच वीजपुरवठा करणारी उपकरणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने व काही पुराच्या पाण्यात बुडल्याने पाटण शहरासह पाटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील महावितरणची वीज सध्या गायब झाली आहे त्यामुळे नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Asim Sarode : या ६ गोष्टी ठाकरेंच्या बाजूने ; शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर वकील असीम सरोदेंनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं

2026-09-16 09:25:36

Asim Sarode : या ६ गोष्टी ठाकरेंच्या बाजूने ; शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर वकील असीम सरोदेंनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं

Health Tips : घसा खवखवणे ते पोटदुखी… छोट्या-छोट्या त्रासांवर 'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण, एकदा करून पाहा.!

2026-09-15 14:05:43

Health Tips : घसा खवखवणे ते पोटदुखी… छोट्या-छोट्या त्रासांवर 'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण, एकदा करून पाहा.!

Satara DCC Bank Election: जिल्हा बँकेत राजकीय भूकंप? २१ जागांसाठी बंद दाराआड मोठा डाव; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

2026-09-14 00:45:38

Satara DCC Bank Election: जिल्हा बँकेत राजकीय भूकंप? २१ जागांसाठी बंद दाराआड मोठा डाव; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Balasaheb Desai Sugar Factory: देसाई कारखान्याचा मोठा प्लॅन! ३ लाख टन गाळपाचं लक्ष्य; पण 'या' एका गोष्टीमुळे वाढली चिंता?

2026-09-14 00:30:59

Balasaheb Desai Sugar Factory: देसाई कारखान्याचा मोठा प्लॅन! ३ लाख टन गाळपाचं लक्ष्य; पण 'या' एका गोष्टीमुळे वाढली चिंता?

Satara Cricket Stadium: सातारकरांसाठी मोठी बातमी! शहरात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

2026-09-14 00:15:32

Satara Cricket Stadium: सातारकरांसाठी मोठी बातमी! शहरात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम