Video : सासवडकऱांचा निरोप घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Updated On:

पुणे- सासवड येथे माऊलींच्या पालखी सोहळा मुक्कामी असल्याने सासवडनगरी माऊलीमय झाली होती. “विठू नामाचा गजर विठू नामाचा जयघोष’ करीत येथील पालखी तळावर विसावलेल्या माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजता पुन्हा पुढील प्रवासास सुरुवात झाली आहे.
सर्व वारकरी शिस्तबद्ध पणे पंढरपूरकडे रवाना होत आहेत. पुढील मुक्काम हा जेजुरी या ठिकाणी असणार आहे.





