Mumbai : विकीची कृती सर्वांनाच भावली! मंचावर जात दिग्गजांच्या पाया पडून घेतले आशिर्वाद, Video Viral, कणा कविता केली सादर

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचा मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यसाठी कला क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी प्रमुख निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातील अभिनेता विकी कौशल आणि चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे देखील उपस्थित होते.
या कार्य्रमात मंचावर उपस्थित असणाऱ्या दिग्गजांनी कविता सादर केली. विकीने देखील मराठीमध्ये कविता सादर केली. कविता होती कुसुमाग्रज यांची कणा. मात्र, व्यासपीठीवार आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांची गळाभेट घेतली. आशा भोसले यांची विचारपूस केली. त्यांचे आशिर्वाद घेतले. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विकी कौशलने या कार्यक्रमात वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सादर केली.
मला दहावीत मराठीत जास्त मार्क्स मिळाले, इंग्रजीत कमी मिळाले होते. पण माझं मराठी इतकं छान नाही. त्यामुळे काही भूलचूक झाली तर मला माफ करा, असे विनम्रपणे विकीने सांगितले. विकी व्यासपीठावर येताच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गळाभेट घेतली. यानंतर जवळच बसलेल्या जावेद अख्तर यांना देखील अभिवादन केले. तसेच आशा भोसले, अशोक सराफ या दिग्गज मंडळींच्या विकी पाया पडला. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची गळाभेट घेतली. अभिनेत्री सोनाली बेंद्रेची देखील विकीने विचारपूस केली.
विकीने रितेश देशमुखची विचारपूस करत त्याची देखील गळाभेट घेतली. यावेळी त्याच्या पाठीवर रितेशने कौतुकाची थाप दिली. दिग्दर्शक महेश मांजेकरांच्या देखील विकी पाया पडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याच्या कृतीचे कौतुक केले जात आहे.
विकीने सादर केलेली कविता ‘कणा’
‘ओळखलत का सर माला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा !





