विकी कौशल आणि रणबीर कपूरचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास; लोक झाले चकित
Vicky Kaushal and Ranbir Kapoor | अभिनेता विकी कौशल आणि रणबीर कपूर ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. यातच आता दोघांचा विमानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विकी कौशल आणि रणबीर कपूर आपले राजस्थानमधील शूटिंग पूर्ण करून मुंबईला जात होते. तेव्हा विमानात त्यांना पाहून प्रवाशांना प्रवासी आश्चर्यचकित झाले. हे दोघेही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले.
Vicky Kaushal & Ranbir kapoor😍😍#Vickykaushal #RanbirKapoor pic.twitter.com/dziXT0XNXq
— NARESH (@naresh__off_) August 25, 2025
विकी कौशल आणि रणबीर कपूर अचानक इकॉनॉमी क्लासमध्ये दिसल्यामुळे प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी प्रवाशांनी विकी कौशल आणि रणबीर कपूरचे फोटो आणि व्हिडीओ काढले. सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Vicky Kaushal and Ranbir Kapoor |
यापूर्वी, रणबीर आणि विक्की यांचे मुंबई विमानतळावर गळाभेट करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यानंतर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Vicky Kaushal and Ranbir Kapoor |
हेही वाचा:





